आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय
शिवसेना सहसंपर्क प्रमुख सह निवड झालेल्या पदाधिकारी यांचा सत्कार
रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
वसमत विधानसभेतील शिवसेनेचे नवनियुक्त पदाधिकारी यांची निवड झाल्यानंतर आज वसमत येथे आल्यावर त्यांचा जंगी सत्कार शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.
यावेळेस शिवसेना सहसंपर्क प्रमुख पदी निवड झालेले सुनिल भाऊ काळे ,उपजिल्हाप्रमुख अनिल कदम,तालुकाप्रमुख बालाजी तांबोळी ,संघटक संभाजी बेले यांचा सत्कार करण्यात आला .

शहरातील बसवेश्वर चौक गवळी मारुती मंदिर येथे फाटक्याची आतिषबाजी करण्यात आली तसेच येथून शिवतीर्थ छ.शिवाजी महाराज पुतळा येथे पर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला तसेच शिवसेना संपर्क कार्यालय येथे नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळेस सहसंपर्क प्रमुख सुनील भाऊ काळे ,उपजिल्हाप्रमुख अनिल कदम ,तालुकाप्रमुख बालाजी तांबोळी,माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार,संभाजी बेले,दिपक हळवे,युवासेने जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती,काशीनाथ भोसले,धनंजय गोरे,बालाजी काळे,गणेश काळे,रमेश जाधव,राजेश पवार,कपिल नवघरे,साईनाथ पतंगे,रामु चव्हाण,अंबादास साबळे,राहुल मेटे,शिवाजी तांबोळी,अनिकेत कार्ले,परमेश्वर चव्हाण,राजेश क्षीरसागर,रमेश काळे,संजय कुरूडे,उमेश काळे,रमण पतंगे,चंद्रकांत डरंगे,गोपीनाथ माने,बबन मेटे,अमोल डरंगे सह शिवसेना ,युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.