वसमत शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये शहर पोलिसांच्या वतीने कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले
शहरातील विविध भागातून चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळ घातक हत्यारे शस्त्र जप्त करण्यात आल्याची माहिती असून सदरील कोंबिंग ऑपरेशन वसमत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, सपोनी गजानन बोराटे ,पोउनि बाबासाहेब खार्डे , आवडे,महिपाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी भगीरथ सवंडकर,गुंडरे,मिराशे ,पोले, चव्हाण,हकीम ,शेख नायर, बालाजी वडगावे,सुनिल गोरलावाड यांच्यासह पोलीस कर्मचारी होमगार्ड अदिनी ही मोहीम राबवली. सदरील कोंबिंग ऑपरेशन रात्री 11 ते सकाळी चार वाजेपर्यंत चालले असून यामध्ये अंदाजे 14 ते 15 घातक शस्त्र जप्त केल्याची माहिती आहे.