वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी आज वसमत चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांचे नियुक्ती केल्याचे पत्र पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी काढले आहेत. हट्टा पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजेंद्र सरोदे यांची नांदेड येथे प्रशासकीय कारणास्तव बदली करून त्यांचा जागी वसमतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांना पदभार देण्यात आला असून आज हट्टा पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून गजानन बोराटे यांनी पदभार स्वीकारला आहे त्यांच्या निवडीबद्दल बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे