
वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील माहे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती वर प्रशासक नेमण्याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज काढले असून हिंगोली जिल्ह्यातील 62 तर वसमत तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतची मुदत येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये संपत आहे.
कोविड 19 आजाराबाबत शासनाने लागू केलेले निर्णय तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विविध रिट याचिकांमुळे जानेवारी 2019 ते सप्टेंबर 2022 या कालावधीतील मुदत संपणारा ग्रामपंचायतच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात आल्या आहेत .
आता राज्यातील माहे ऑक्टोबर ते 2022 ते डिसेंबर 2022 या कलावधीमध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील 7649 तसेच नवनिर्मित आठ तसेच मागील निवडणुकीमध्ये समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या 18 अशा एकूण 7675 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त झाले असल्याने या ग्रामपंचायतीचे प्रभाग रचना मतदार यादी तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे दोन ते तीन महिन्याचा कालावधी आवश्यक असल्याने माहे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये मुदत संपणारा ग्रामपंचायतच्या मुद्दत जशी संपेल तसे त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणू पुढील कार्यवाही करावी असे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून वसमत तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीवर आता प्रशासक येणार असल्याचे आदेश प्राप्त झाले आहे.