वंचित आघाडीची गांधीगिरी करत आरोग्य अधिका-याच्या रिकाम्या खुर्चीला घातला हार
रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या कुरुंदा या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे चर्चेचा विषय बनला असून आरोग्य केंद्रातील सोयीसुविधा, डॉक्टरांची गैरहजेरी ,सुरक्षा रक्षक नसने अशा कारणाने नेहमीच कुरुंदा आरोग्य केंद्र हे चर्चेत राहिलेले आहे.
याबाबत वंचित बहुजन आघाडीने कुरुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली असता तेथील वैद्यकीय अधिकारी हे उपस्थित नसल्याने त्यांची वाट बघत थांबलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क खुर्चीला हार घालून गांधीगिरी करत आरोग्य केंद्रातील सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
कुरुंदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णालयातील डिलिव्हरी वार््ड स्वच्छलय ओपीडी या ठिकाणी अतिशय घाणीचे साम्राज्य पसरले असून रुग्णांना या अस्वच्छतेमध्ये राहावे लागत असल्याने डासांचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढत असून रुग्ण बरे होण्याऐवजी आजारी पडत असल्याचे यावेळी दिसून येते .प्रत्येक वार्डामध्ये घाण्याचे साम्राज्य दिसून आल्यामुळे दवाखान्यांमध्ये स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा येथे उपलब्ध नाही या रुग्णालयातील डॉक्टर्स नर्स व इतर कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा अपुरे असून यामुळे याचा परिणाम रुग्णालयातील रुग्णांवर मिळणाऱ्या सोयी सुविधांवर होत असून लवकरात लवकर या ठिकाणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी तसेच रुग्णालयामध्ये सुरक्षा रक्षक नसल्याने महिला बाळंतीण यांची सुरक्षा सुद्धा रामभरोसे असून एखादी अप्रिय घटना घडल्यास यास जबाबदार कोण याचाही उपाययोजना करत लवकरात लवकर सुरक्षा रक्षक नेमावे अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली तसेच याबाबत डॉक्टरांना विचारपूस केली असता डॉक्टर उडवा उडवी चे उत्तर देत असून तुम्हाला काय करायचे ते करा असे धमकी वजा इशारा देत आहेत यामुळे या सर्व प्रकारात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष द्यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला असून या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रकाश गव्हाणे भीमराज कांबळे आकाश इंगळे अमोल सोनटक्के मनीष खंदारे दीपक इंगोले आदींच्या स्वाक्षरी आहेत.