
वसमत / रामु चव्हाण
वसमत येथील माहेर हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर सना उल्ला खान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पळसगाव परिसरातील वृद्धाश्रम मध्ये राहणाऱ्या वृद्ध लोकांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली. ज्यामध्ये आपल्या घरापासून दूर असलेले जवळपास 20 वयोवृद्ध माणसं तेथे राहत आहे त्या लोकांना अर्धांग वायू, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा प्रकारच्या अनेक आजारांचा ते सामना करत आहे त्या लोकांना योग्य आरोग्यसेवा मिळावी म्हणून माहेर हॉस्पिटल चे सनाउल्ला खान व त्यांचा पत्नी डाॅ हिना खान यांनी त्या सर्व वृद्धांची आरोग्य तपासणी करून योग्य ते औषधोपचार केले तसेच त्यांना फळ व इतर खाऊचे वाटप करण्यात आले .
यावेळी डॉ सनाउल्ला खान यांनी बोलताना सांगितले की सदरील वृद्धाश्रमास जेव्हा केव्हा आरोग्य विषयक मदत लागत तेव्हा हाक द्या आपल्या सेवेसाठी माहेर हॉस्पिटल चे दरवाजे 24 तास उघडे आहेत. असा विश्वास दिला.

यावेळेस डॉक्टर हिना खान तसेच माहेर हॉस्पिटल ची संपूर्ण टीम नगरसेवक नदीम सौदागर तसेच वृद्धाश्रम चे संचालक बोखारे सर व त्यांची टीम उपस्थित होती.