आकार स्कुल आणि मी वसमतकर परिवाराचा दिवाळी स्नेह मिलन आणि पारितोषिक वितरण सोहाळा महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण
वसमत / रामु चव्हाण
अकार प्री स्कुल वसमत आणि मी वसमतकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या दिवाळी स्नेह मिलन आणि पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ष.ब्र. १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्कारक्षम बालक घडले पाहिजेत आणि ते बालक पुढे जबाबदार तरुण म्हणुन देशसेवा करतील असा संदेश यावेळी महाराजांनी दिला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन भा.ज.पा. नेते माजी प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर, श्रीकांत (नाना) देशपांडे, डॉ.सौ.सुचिता पार्डीकर, परिक्षक प्रतिनिधी सौ.अनुराधा पवार मॅडम (नांदेड) यांची उपस्थीती होती.
दिवाळिची गंमत जंमत आजी अजोबांच्या सोबत या कार्यक्रमात आकार स्कुल च्या मुलांनी पारंपारीक दिवाळी हि नाटीका सादर केली. आजी अजोबांवरील गीत सादर केले. आणि आपण आपला दिवाळीचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करु शकतो असा संदेश दिला. तसेत दिवाळीतील किल्ल्यांच प्रदर्शन सुध्दा विद्यार्थ्यांनी केले होते त्यात जलदुर्ग आणि किल्ल्यांचा समावेश होता.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या रंगभरण, पोस्टर ,बातमी वाचन, हस्ताक्षर, आकाश दिवे बनविणे, या सर्व स्पर्धांचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मी वसमतकर आयोजीत महालक्ष्मी सजावट स्पर्धा 2022 चे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी प्रथम पारितोषिकाचे विजेते.सौ. शांता धोंडूसा कडतन यांना रु.15000 मानाची पैठणी नथ सन्मानचिन्ह ,मानाचा फेटा (गजानन बाबा वस्त्र भांडार,वसमत) यांना गौरवीण्यात आले . तर द्वितीय पारितोषिक : सौ.निर्मला भगवान अडकटलवार (एक ग्राम सोन्याचा मुलामा असलेला नेकलेस संजय आहेर देवकृपा ज्वेलर्स) . तृतीय पारितोषिक सौ.वैष्णवी स्वानंद महाराज (महाराजा समई, डॉ.सुचिता पार्डीकर यांच्यातर्फे) ,तर उत्तेजनार्थ पारितोषिक सौ. अनिता महादेव स्वामी (न्यु सुरभी लेडीज एम्पोरियम अॅन्ड ब्युटी पार्लर यांच्यातर्फे), सौ.माया सुरेश हमाने (धनंजय गोरे मा.नगरसेवक यांच्यातर्फे).
तसेच घरगुती गणपती सजावट स्पर्धेमध्ये प्रथम बक्षिसाचे विजेते कु.संजना कदम व परिवार (रु 5555 श्री संजय भोसले यांच्यातर्फे) द्वितीय श्री.मन्मथ सैदाने व परिवार (रु4444 श्री प्रशांत काबरा यांच्यातर्फे),तृतिय बक्षिस सौ.शारदा लड्डा व परिवार. (रु.3333 श्री पंकज अडसिरे यांच्यातर्फे) ,चौथे बक्षिस श्री.विनोद शिंदे व परिवार (रु 2222 ओमसाई हॉस्पिटल यांच्यातर्फे) पाचवे बक्षिस श्री .राजु सलामे व परिवार (RDM ब्युटी सलुन यांच्यातर्फे) तर उत्तेजनार्थ बक्षिस श्रीनिवास ताटेवार यांनी पटकावले.
याचबरोबर मानाचे गणपती देखावा (झाकी) स्पर्धा -2022 मधे प्रथम बक्षिस .विजय गणेश मंडळ ,द्वितीय बक्षिस सार्वजनीक गणेश मंडळ, तृतीय बक्षिस राजस्थान गणेश मंडळ यांनी मिळवले .
या भव्य कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी देव देश धर्मासाठी काम करणार्या मी वसमतकर परिवाराचे कौतुक केले.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्तावीक सौ.रती अदित्य देशपांडे यांनी केले तर सुत्रसंचलन सौ.अनघा जोशी ,अभिषेक गजानन पाठक यांनी केले तर आभार शंकर घोटेकर यांनी मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आकार स्कुलचे शिक्षीका, शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मी वसमतकरचे अदित्य देशपांडे,संतोष दासरे, मारुती कल्याणकर, वैभव मैड, महेश जोशी , शंकर घोटेकर, श्रीकांत जोगदंड,वैभव अनवेकर राजेश तमखाने, विवेक कदम, सुरज दुशटवार, निहार जाधव, पांडुरंग डाखोरे यांनी परिश्रम घेतले .
दिवाळी फराळाने कार्यक्रमाची सांगता झाली.