खासदार हेमंत पाटील यांच्यामुळे हिंगोली जिल्हा विकासाच्या प्रवाहात
खा. डाँ. श्रीकांत शिंदे, यांचे कळमनुरीच्या भाऊबीज कार्यक्रमात प्रतिपादन
वसमत / रामु चव्हाण
मागील सराकराच्या काळात सामान्य माणसांची कामे वेळेत होत नव्हती. सत्तेवर आल्याने त्यांना घरातून बाहेर निघण्यास वेळ शिल्लक नव्हता. परंतु राज्यात एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात खासदार हेमंत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हळद संशोधन प्रक्रिया केंद्रासारखे मोठे प्रल्पक सुरु झाले असून खऱ्या अर्थाने हिंगोली जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघ विकासाच्या प्रवाहात आला असल्याचे प्रतिपादन कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डाँ. श्रीकांत शिंदे यांनी येथे केले.
भाऊबीज निमित्त कळमनुरीचे आमदार तथा हिंगोली जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी शुक्रवारी (दि. २८) आयोजित केलेल्या येथे साडी वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून संसदरत्न खासदार डाँ. श्रीकांत शिंदे बोलत होते. या प्रसंगी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार संजय रायमुलवार, जितेंद्र महाराज, हिंगोली जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे, परभणी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे, युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम, तालुका प्रमुख जयदीप काकडे, वसमत तालुका प्रमुख राजू चापके, शहर प्रमुख बबलु पत्की, संतोष राठोड, संजय बोंढारे, पप्पु अड्कीने, प्रभाकर क्षीरसागर , बाबा अफूने ,माजी सभापती रामकिशन झुन्झुर्डे, माजी सभापती फकिरा मुंडे, माजी सभापती आकाश रेड्डी, नांदेडचे जिल्हा प्रमुख आनंद बोंढारकर तीडके पाटील, उमेश मुंडे यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना खासदार डाँ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, मागील सरकारच्या काळात रोजगार देण्याची घोषणा केली परंतू प्रत्यक्षात दारावर आलेल्या एकाही सामान्य कार्यकर्त्यांना वेळेवर भेट मिळाली नाही. त्यामुळे रोजगार सोडा सामान्य कार्यकर्त्यांना साधी भेट देखील होत नव्हती. आमच्या सराकारने घोषित केलेली बेरोजगार युवकांना रोजगार देण्याची योजना पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे सुशिक्षित तरुणाईच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यात आम्हाला लवकरच यश येईल असे ते म्हणाले.
तर यावेळी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील मागच्या सरकारमध्ये कशा पद्धतीने चुकीची कामे केली जात होती आणि त्यामुळेच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोकाची भूमिका घेण्यास भाग पडले, त्यामुळे गद्दारी एकनाथ शिंदे यांनी नव्हे तर उद्धव ठाकरे यांनीच खऱ्या अर्थाने केल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात नाविन्यपूर्ण आणि विकासात्मक कामे करत असलेले खासदार हेमंत पाटील व आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे. असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.