
वसमत : रामु चव्हाण
टोकाई ते गिरगाव रस्त्याचे काम मागील काही महिन्यांपासून सुरु असून या रस्त्यावर खाजमापूरवाडी शिवारात पूल बांधण्यासाठी खड्डा खोदण्यात आला आहे. याच खड्ड्यात 27 मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मोटारसायकलसह पडून दोघांचा मृत्यू झाला. यात केदार विलास रायवाडे (वय 22, रा. गिरगाव), परमेश्वर विश्वनाथ बुरफुटे (वय 30, रा. गिरगाव) अशी मृतांची नावे आहेत.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी येथे गर्दी केली. गुत्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे नातेवाईकांनी आरोप केला आहे . नातेवाईकांनी पुलातील पाणी उपसण्याचे काम रोखले होते. जोपर्यंत गुतेदार येत नाही तोपर्यंत पाणी उपसू देणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला होता. दरम्यान, कुरुंद्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, जमादार तुकाराम आमले, वाबळे, आंबेकर, बालाजी जोगदंड आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे पुलातील पाणी उपसाकरून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.या प्रकरणात पुढील तपास कुरूंदा पोलिस करत आहे.