
जगदगुरू तुकाराम महाराज पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुभाषराव भोपाळे तर उपाध्यक्ष पदी संगमनाथ मुखाडे यांची बिनविरोध निवड.
वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेली जगद्गुरु तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती .यामध्ये आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक बिनविरोध होऊन यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज नागरी पतसंस्थेचा धुरा यशस्वीपणे सांभाळून तालुक्यातच नव्हे तर मराठवाडय़ात बँकिंग क्षेत्रात नावलौकीक करून बँकिंग क्षेत्रातील विविध पुरस्कार मिळवणारी जगद्गुरु तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष नारायणराव भोपाळे यांची तर उपाध्यक्षपदी संगमनाथ मुखाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के.एस. दुधमल यांनी काम पाहिले यावेळी संचालक मंडळाच्या वतीने श्री गणेशराव काळे, पांडुरंगराव गोरे, गणपतराव नादरे,शिवाजीराव अलडिंगे ,हरिहर अलसटवार,सौ शकुंतलाबाई दशरथे, सौ.प्रेमिलाबाई सिरसुलवार,सौ शिवकांता पांचाळ, सौ सुरेखा चव्हाण आदी संचालक यावेळी उपस्थित होते .

तसेच जगद्गुरु तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत चव्हाण, दौलतराव काळे, गजाननराव इंगोले, देशमुख, बोरकर, एस एल पांचाळ, सोनी गवळी, जी व्हि गोरे, ताटीकोंडलवार, करजकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.