अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णयानुसार हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांचे नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हिंगोली जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज जिल्ह्यातील विविध प्रवर्गातून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती केल्या आहेत .
यामध्ये वैद्यकीय तज्ञ डॉक्टर बालासाहेब सेलुकर यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे .
वसमत येथील शिवम हॉस्पिटल च्या माध्यमातून अनेक रुग्णांना अल्पदरात सेवादेउन या रुग्णालयात लाखो रुपयांचे उपचार व शस्त्रक्रिया अगदी मोफत करून अनेक रुग्णांना जीवनदान देणाऱ्या डॉक्टर बालासाहेब सेलूकर यांच्या कार्याची दखल घेत आज माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील शासकीय सदस्य पदी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर डॉक्टर बालासाहेब सेलुकर यांची निवड केली आहे.
त्यांच्यासोबत अकोली येथील राजश्रीताई नाथराव कदम, हिंगोली जिल्ह्यासह मराठवाडा ग्राहक संरक्षण याच्या माध्यमातून अनेक ग्राहकांना फायदा तसेच लाभ मिळवून देणारे त्याचबरोबर जिल्हा ग्राहक संरक्षण च्या माध्यमातून ग्राहक जागरूकता निर्माण करून ग्राहकांना ग्राहकांचे हक्क व कायदे याबद्दल ज्ञान देणारे
शेख इबहादुर रहमान अब्दुल वाहिद, गिरगाव येथील पत्रकार प्रमोद नादरे, भोरीपगाव येथील गोरखनाथ पाटील यांचे सुद्धा अशासकीय पदी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड झाली आहे .त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.