स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत प्रदान करण्यात येणारा उत्कृष्ट पुरस्कार 2022 23 करिता समिती गठित करण्यात आली होती आणि त्या समितीने विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थीची निवड करून त्यांना विविध पुरस्कार जाहीर केले आहे.
यामध्ये सहकार क्षेत्रातील महर्षी माजी मंत्री तथा राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांना यावर्षीचा जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट महाविद्यालय उत्कृष्ट प्राचार्य महाविद्यालयीन शिक्षक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड करून त्यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.
माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने जीवनसाधना गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.