वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनच्या स. पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे यांनी शासनाने बंदी घातलेल्या अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या एका ऑटोवर धाड टाकत ऑटो आणि गुटखा असा दोन लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वसमत आसेगाव रोडवर 27 मार्च रोजी दुपारी दोन वा. सुमारास एका ऑटो मध्ये अवैध गुटखा घेऊन एक जण येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली यावेळी ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून टाकळगाव रोड वर ऑटो क्रमांक MH22 AP481 इसम नावे शेख उमर शेख नसीर हा अंदाजे 40 हजार रुपये किंमतीचा गुटखा ज्यात राजनिवास तंबाखू व गुटख्याच्या पुड्या व ऑटो असा 2,40,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक व मा.अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री अनिल काचमांडे, पोउपनि श्री संदीप यामावार,पोशि अंबादास विभुते,पोह संजय गोरे,पोह सचिन शिंदे,पोह जावेद यांनी केली. सदर प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती