आदित्य देशपांडे यांची भा.ज.पा. उद्योग आघाडी प्रदेश सहसंयोजक पदी निवड
वसमत/ रामु चव्हाण
वसमत येथील तरूण उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आदित्य देशपांडे यांची भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी च्या प्रदेश सह संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या उद्योग आघाडीवर आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे संघटन वाढवावे, महाराष्ट्र राज्यातील सुक्ष्म, लघु, मध्यम, मोठे उद्योगांसाठी केंद्रशासन व राज्यशासनाच्या सर्व योजनांचा फायदा मिळवून देऊन “आत्मनिर्भर भारत” ही पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांची संकल्पना उद्योजकांमध्ये रूजवाल तसेच युवा, महिला, उद्योजकांचे भारतीय जनता पार्टीमध्ये मोठे संघटन निर्माण करणेसाठी अथक परिश्रम घ्यावे असे नियुक्तीपत्र प्रमोद वाकोडकर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेश यानी दिले आहे.
आदित्य देशपांडे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.