वसमत शहरातील असेगाव रोडवर असलेल्या साईनगर साईबाबा मंदिराच्या बाजूला दिनांक एक जुन च्या रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास वसमत शहर पोलिसांचे पथक यामध्ये पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम पोलीस उपनिरीक्षक महिपाळे ,स. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे , पोलीस कर्मचारी संदीप जोंधळे, शेख, गुंडरे, राहुल राठोड ,अश्फाक शेख हे
पेट्रोलिंग करत असताना काही इसम तिथे संशयितरित्या आढळून आले यावेळी पोलीस पथकाने त्यांचे विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवी चे उत्तरे दिले पोलिसांना यावेळी त्यांचा संशय आल्याने त्यांची झाडाझडती घेतली असता या पाच इसमांकडे दरोडाच्या उद्देशाने त्यांच्याजवळ एक एअरगन पिस्टल, एक लोखंडी कत्ता, एक लोखंडी सुरा, सुताची दोरी, मिरची पूड ,एक सब्बल असे हत्यार मिळून आले हे करत असताना अंधाराचा फायदा घेत दोन दरोडेखोर फरार झाले तर तिघांना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले हे करत आहेत