हिंगोली जिल्ह्यातून अमेरिकेच्या साऊथ डकोटा स्टेट युनिव्हर्सिटी येथे इंजीनियरिंग साठी वसमत येथील सहाय्यक निबंधक वसमत येथे कार्यरत असलेले किशोर सोनाजी दुधमल यांचे चिरंजीव आदित्य किशोर दुधमल यांची निवड झाली आहे.
आदित्य किशोर दुधमल याची बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी साउथ डकोटा स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिका येथे कम्प्युटर सायन्स ला इंजिनिअरिंग साठी निवड झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातून त्याची एकमेव निवड असल्याने या शिक्षणासाठी महाराष्ट्रातून मोजकेच विद्यार्थी पात्र ठरतात त्यामध्ये आदित्यची निवड झाली असून या कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग बरोबरच त्याला अमेरिकेची शिष्यवृत्ती सुद्धा मिळालेली आहे. त्यामुळे बारावीनंतर परदेशी शिक्षणासाठी आदित्य दुधमल हा जाणार असून त्याला इंजीनियरिंग व अमेरिकेची शिष्यवृत्ती मिळाल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
त्याच्या निवडीबद्दल सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वसमत चे आसाराम गुसिंगे, सूर्यवंशी ,संतोष पतंगे ,गोपाळ भोसले, देशमुख,डुुकरे,प्रकाश मुत्तेवार,उधाने ,भवर यानी केले.