वसमत उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर साठी सातत्याने पाठपुरावा करणारे वसमत विधानसभेचे आमदार राजूभैय्या नवघरे यांनी पाठपुरावा करत तालुका स्तरावर डायलिसिस सेंटर मंजुर करून आणले आहे.
आमदार राजुभैया नवघरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून वसमत येथील उपजिल्हा रुग्णालय, वसमत येथे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत पीपीपी तत्त्वावर डायलिसिस सेंटर मंजूर करून आणले आहे. त्यामुळे डायलिसिसची आवश्यकता लागणाऱ्या अनेक रुग्णांना हे डायलिसिस सेंटर जीवनदायी व उपयुक्त ठरणार आहे.
पूर्वी डायलिसिस सेंटर तालुका स्तरावर नसल्याने अनेक रुग्णांना महागड्या व दूरच्या ठिकाणी जाऊन आपले उपचार करावे लागत होते. यात त्यांचे प्रचंड हाल होत होते. आता वसमत येथे डायलिसिस सेंटर होत असल्याने रुग्णांचे होणारे हाल आता टळणार आहेत.
नक्कीच हे डायलिसिस सेंटर रुग्णांना लाभदायी ठरेल असा विश्वास आहे आमदार राजू भैया नवघरे यांनी बोलून दाखवले अनेक रुग्णांना महागड्या आणि दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन डायलिसिस करण्याासाठी जो आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता तो आता न बसता वसमत तालुक्यातच आता डायलिसिस सेंटर मंजूर झाल्याने सर्व रुग्णांची आर्थिक पिळवणूक ही थांबेल असा विश्वास आमदार राजू भैया नवघरे यांनी बोलून दाखवलं यामुळे लवकरच वसमत उपजिल्हा रुग्णालयातील डाायलिसिस सेंटर सुरू होणार असल्याची माहिती आमदार राजू भैया नवघरे यांनी दिली.