वसमत तहसील परिसरात लावलेला एक टिपर वाहन मालक आणि चालक यांनी चोरून नेल्याची तक्रार वसमत चे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिल्यावरून शहर पोलीस स्थानकामध्ये टिपर आरोपीत संशयीत चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमतचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 10 एप्रिल रोजी चे सकाळी चार ते सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तहसील परिसरातून वाहन क्रमांक MH 04 AF 3607 अशोक लेलँड कंपनीचे टिप्पर एकूण अंदाजित रक्कम दोन लाख रुपये किमतीचे वाहन चोरून नेल्या असल्याची तक्रार दिली या तक्रारीवरून आरोपीत संशयीत वाहनचालक , वाहन मालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महिपाळे हे करत आहे.