वसमत तालुक्यातील बाभूळगाव च्या मुलींचे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त आयोजीत कराटे स्पर्धेत यश
वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील बाभूळगाव येथील मुलींनी स्वराज्य रक्षक स्वराज्याचे धाकले धनी छ्त्रपती संभाजी राजे शिवाजी राजे भोसले यांच्या जयंती निमीत्ताने श्री तुळजाभवानी स्टेडीअम उस्मानाबाद येथे ओपन कराटे चॅम्पीयनशिप चे आयोजन करण्यात आले होते .
सदरील चॅम्पीयनशिप
वर्षास्टाईल शोतोकॉन युथ फॉऊंडेशन इंड़ीयाचे अध्यक्ष सिहांन महावीर चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली सेन्साई मनोज पतंगे यांनी केले होते.
हिंगोली जिल्हा स्पोर्ट कराटे डो असोशीएशन चे सचिव संतोष नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयाचे कराटे कोच शेख मोईन यांनी मुलींना प्रशिक्षीत करूण त्यांना शारीरीक माणसीक दृष्टया सक्षम करून त्यांचे मनोबल उचांवण्या करिता कराटे स्पर्धेत सहभागी केले त्यांनी अचाट धैर्य , अजोड पराक्रम , असामान्य शौर्य , प्रयत्नांची पराकाष्ठा , अनेक भाषांवर प्रभुत्व ,बुध्दीवंत अशा छत्रपती शंभू राजे च्या जयंती दिनी त्यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवुण त्यांना अभिवादन करत नेत्रदिपक कामगीरी करत यश संपादन केले त्यात
गोल्ड मेडल :-
कु.पुणम उद्धव नवघरे
कु . श्रद्धा बाबाराव नवघरे
कु. तनुजा दिनाजी बुजवणे
सिल्व्हर मेडल :
कु.शितल दगडू लाटे
कु. सायमा मोईन शेख
ब्रांज मेडल
कु.ममता पांडूरंग सोलव यांनी
यश संपादन केल्या बदल
वसमत विधानसभेचे लोकप्रीय आमदार राजुभैया नवघरे , जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे , क्रीडाअधिकारी श्री बस्सी सर , संजय बेतीवार , का.कर्मचारी वसीम सर
कराटे जिल्हा अध्यक्ष गोपाल इसावे , राजु दवणे , भीमराव सरकटे , विजय डोंगरे , प्रविण कांबळे , हर्षद खरे ,रामभाऊ टाकणखार सरपंच बाभूळगाव श्री भागवत ढोरे, उपसरपंच शेख गौस सर्व ग्रामपंचायत सदस्य बाभूळगाव व परिसरातील क्रीडा प्रेमी कौतुक करत आहेत .