वसमत तालुका कृषी कार्यालयाचा अजब कारभार पहावयास मिळाला असून जिवंत शेतकऱ्याला चक्क मयत दाखवून लाभापासून वंचित ठेवण्याचा धक्कादायक प्रकार वसमत तालुका कृषी कार्यालयाने केल्याने या अजब कारभाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी तालुका कृषी प्रशासन तसेच महसूल प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
वसमत तालुक्यातील हयातनगर येथील कैलास मच्छिंद्र पुरी यांनी महाडीबीटी पोर्टलवर 19 जून 2022 रोजी यांत्रिकी अंतर्गत नऊ फणी पेरणी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रासह पोर्टलवर अपलोड केला होता .या संबंधित शेतकऱ्याने वारंवार ऑनलाईन अर्जाची छाननी केली असता दिनांक 25 जून रोजी सदरील अर्ज लाभार्थी मयत आहे म्हणून बाद केल्याचा रिमार्क टाकून सदरील अर्ज बाद केला असल्याचे पोर्टलवर नोंद करण्यात आली पण जिवंत शेतकऱ्याला मयत दाखविण्याचा अजब प्रकार तालुका कृषी कार्यालयाने केला असून याबाबत शेतकरी कैलास पुरी यांनी वारंवार तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या खेटा मारून सुद्धा त्यांना कुठलाही प्रतिसाद संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा त्यांच्या शासकीय कर्मचारी यांनी दिला नाही त्यांना मयत का दाखवलं अर्ज का बात केला याचे कारण सुद्धा संबंधित अधिकारी देण्यास तयार नाहीत. एवढ्या गंभीर प्रकाराकडे खोटा रिमार्क टाकून या शेतकऱ्यांना लाभांपासून वंचित ठेवण्यासाठी जे कोणी अधिकारी कर्मचारी यात सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन कैलास पुरी यांनी जिल्हा प्रशासन ,तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना देण्यात आले असून यावर तालुका कृषी अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी आमदार राजू भैया नवघरे यांनी सुद्धा दखल घेऊन तालुका कृषी अधिकारी यांना संबंधित लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात यावे व भविष्यात पुढे अशी कुठलीही चूक करू नये असे सूचनाही देण्यात केल्या आहेत.