मनोजदादा जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा व शासनाने लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावे यासाठी बंदचे आवाहन
संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटलांचे उपोषण सरकारने पुढाकार घेऊन त्वरित सोडवणे बाबत वसमत बंदची हाक देण्यात आली आहेत
अखंड मराठा समाजाच्या वतीने गरजवंत मराठ्यांच्या 50% च्या आतून OBC प्रवर्गातून आरक्षणासाठी संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील गेल्या एक वर्षभरापासून आंदोलन करत आहेत. आता पर्यंत मनोज दादा जरांगे पाटलांनी सहा वेळा आमरण उपोषण केले आहे. मनोज दादा जरांगे पाटील यांची खालावत चाललेली परिस्थिती पाहता व त्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अखंड मराठा समाजाची परीक्षा न पाहता शासनाने पुढाकार घेऊन खालील मागण्या त्वरित मान्य कराव्यात.
१) सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी.
२) हैदराबाद गॅझेट लागू करावे, सातारा गॅझेट लागू करावे. बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करावे. ३) संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांवर झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.
४) कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे.
५) शिंदे समितीने नोंदी शोधण्याचे काम गतीने सुरु करावे.
६) EWS सह SEBC किंवा कुणबी OBC हा पर्याय तात्काळ अंमलात आणावा
७) मराठा आणि कुणबी एकच असल्याचा आध्यादेश शासनाने काढावा.
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सरकार म्हणून पुढाकार घ्यावा आणि विशेष अधिवेशन बोलवून मागण्या मान्य कराव्यात. दोन दिवसात आत सरकारने दादांचे उपोषण पुढाकार घेवुन स्थगित करावे. अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल यांची दखल शासनाने घ्यावी असा इशारा शासनाला देण्यात आला आहे..तसेच यासाठी दि.24 सप्टेंबर रोजी वसमत तालुका कडकडीत बंद ठेवण्याचे निवेदन पोलीस निरीक्षक वसमत व ग्रामीण पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे.
मंगळवारी वसमत तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद रहाणार आहेत या बंद बाबत सर्व शाळा महाविद्यालय यांना पत्र देण्यात आले आहेत.
यामुळे तालुक्यातील सर्व बाजारपेठ शाळा ,महाविद्यालय बंद राहतील तसेच अत्यावश्यक सेवा रूग्णालय,मेडिकल,रुग्णवाहिका सुरू राहतील.