
वसमत / रामु चव्हाण
एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय नारीरत्न पुरस्काराने कुरुंदा येथील माजी सरपंच तथा शिवसेना महिला तालुका अध्यक्ष (उद्धव ठाकरे गट) डॉ सौ प्रीतीताई प्रभाकर दळवी यांना सन्मानित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील एकता सेवाभावी संस्था यांच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांचा राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येते यावर्षी वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील माजी सरपंच तथा शिवसेनेच्या महिला तालुका अध्यक्षषा डॉक्टर प्रितीताई दळवी यांनी केलेल्या कोरोना काळातील कामगिरीच्या बद्दल त्यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

कुरूंद्यात सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतू गावाचे व पर्यायाने देशाचे विकासात्मक ध्येय डोळ्यासमोर ठेवून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महिला दिनाचे औचित्य साधून त्यांना राष्ट्रीय नारीरत्न पुरस्कार 2023 विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात माननीय वैशाली दाभाडे सिने अभिनेत्री मुंबई ,मा. प्रताप भैया देशमुख माजी महापौर परभणी , मा. अनिल नरडी (जेष्ठ समाजसेवक वर्धा , मा . ऍड पवन निकम युवा उद्योजक परभणी ,सुरेश हिवराळे स्वागत अध्यक्ष ,प्रा. कृष्ण कुमार दडके (पुरस्कार निवड समिती अध्यक्ष )व मा. अजमत खान (संस्थापक अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत परभणी येथे प्रदान करण्यातआला . .
कुरूंदा या गावच्या माजी सरपंच तथा महिला तालुका अध्यक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात विविध सामाजिक उपक्रम राबवले त्यामध्ये महिलांमेळाव्यात प्रबोधनात्मक कार्यक्रम, प्लास्टिक बंदी टाळण्यासाठी कापडी पिशव्यांचे वान म्हणून वाटप, शिवजयंती शिवजयंती निमित्त स्वच्छता मोहीम ,आपले गाव हरित गाव करण्यासाठी गावांमध्ये वृक्ष लागवड व त्यासाठी संरक्षण जाळी, कुरुंदा गाव वसुंधरा अभियानामध्ये येण्यासाठी प्रस्ताव दाखल करून त्याची सुरुवात करणे , विकास कामाबरोबरच विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले तसेच कोरोना काळात कोरोना बद्दल व्यवस्थित जनजागृती करून गावामध्ये कोरोना येण्यासाठी प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला,अशा त्यांनी केलेल्या विविध कार्याची दखल घेत त्यांना हा नारी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
त्यांना मिळाललेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.