महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या मुदखेड तालुका कार्यकारिणी 8 जून रोजी मुदखेड येथे जाहीर करण्यात आली.
कुणबी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव, प्रदेश महासचिव व्यंकटराव जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आर. बी. काकडे, माजी उपनगराध्यक्ष माधव कदम यांच्या उपस्थितीत तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कुणबी महासंघाच्या मुदखेड तालुकाध्यक्षपदी किशोर पारवेकर, सचिव पदी साईनाथ बुचाले, उपाध्यक्ष राजकुमार कवळे, कोषाध्यक्ष किरण कुमार वसुरे, सोशल मीडिया प्रमुख माधव वसुरे, संघटक म्हणून ज्ञानेश्वर डोलारकर तर मार्गदर्शक म्हणून गणपतराव कदम व देविदासराव कवळे यांची बैठकीत सर्वांनुमते निवड करण्यात आली.
याच बैठकीत जिल्हा कार्यकारिणीवर राजू बारतोंडे, अमोल आबादार व माधव वसुरे यांची निवडही करण्यात आली. या बैठकीला धनराज पारवेकर, प्रशांत कवळे, आकाश कदम, परमेश्वर आगलावे, नंदकिशोर आगलावे, किशोर पारवेकर, माधव वसुरे, साईराज कदम, पुरोहित सूर्यवंशी, योगेश माने, शिवराज चव्हाण, सचिन शिंदे, सचिन कवळे, गणपतराव कदम यांच्यासह मुदखेड शहरासह तालुक्यातील कुणबी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.