शहरातील नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री. सुर्यकांतराव बोड्डेवार हे दुपारी बाराच्या सुमारास एसबिआय बॅंक तहसिल परिसर येथुन आपले सेवानिवृत्ती वेतन उचलून घराकडे जात असताना, तालूका दंडाधिकारी ( तहसिलदार ) यांचे निवासस्थानासमोर चार अज्ञात युवक एका अॅटोमध्ये आले, आणि त्यांनी बळजबरी रिटायर कर्मचारी यांना अॅटोमध्ये बसविले व तहसीलदाराचे घर ते कारंजा चौक दरम्यान त्यांच्या खिशातील रुपये बाविस हजार ( 22000/-) केवळ काढून घेतले, दिवसाढवळ्या बारा वाजेच्या सुमारास घडलेल्या लुटमारीमुळे शहरातील नागरिकांना सुरक्षिततेचा प्रश्न भेडसावत आहे. पोलीस यावर काय कार्यवाही करतात याकडे शहरवासीय लक्ष ठेवून आहेत. यापूर्वी सुध्दा शहरातील गजबजलेल्या बॅंक परिसरात असे प्रकार घडले आहेत. आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, गंभीर बाब समोर आली आहे, ती म्हणजे शहरातील सि.सि. टि.व्ही. कॅमेरे केवळ शोभेच्या वस्तू म्हणून अस्तित्वात आहेत.याय काही कॅमेरा चालु तर काही बंद आहेत. एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच हा प्रश्न निकाली निघेल काय? अशी चर्चा उपस्थितात होताना दिसून येत होती.