वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीचे बिगुल वाजले असून आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज विक्री व उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून आज दिनांक.18 नोव्हेंबर रोजी दुस-या दिवशी तब्बल 43 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज नेले असून यात 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता पर्यंत एकूण 13 नामनिर्देशन पत्र दाखल झाले तर 117 अर्जांची विक्री झाली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी आसाराम गुसिंगे,सहा.निवडणूक निर्णय अधिकारी डुकरे यांनी दिली आहे.