ताज्या घडामोडी

जनावरे घेऊन जाणाऱ्या पिकपची पोलिसांवर दगडफेक

रामु चव्हाण

वसमत/ रामू चव्हाण

वसमत शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वसमत शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पेट्रोलिंग करण्यात येते. अशीच पेट्रोलिंग वसमत शहरात करत असताना आज सकाळी 05 वा असेगाव रोडवरील ओम गार्डन मंगल कार्यालयाच्या जवळ एक पिकप संशयितरित्या जात असताना वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना दिसला.  यावेळी सदरील पिकप मध्ये चोरीची सामान असल्याचा संशय आल्याने सदरील पिकप ला थांबवण्यासाठी पोलिसांनी अडवले असता सदरील पिकप हा पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न सुद्धा यावेळी करण्यात आल्याचं दिसते सदरील पिकप थांबून पोलिसांनी त्यांना बाहेर येण्यास सांगितले असता तिथून त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली या दगडफेकी मध्ये पोलीस कर्मचारी मुंजाजी पतंगे यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे.  यावेळी पोलिसांनी त्यांना वारंवार सूचना केली असता त्यांनी दगडफेक बंद केली नाही त्यांच्या हातामध्ये तलवारी, राॅड ,गोट्या,गुलेर आणि दगडे असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले यावेळी सदरील आरोपी आणि दगडफेक चालू ठेवले असता पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांनी बचावासाठी हवेत फायरिंग केली यानंतर फायरिंग झाल्यानंतर सदरील आरोपी यांनी गाडीत बसून पिकप मधून नांदेड कडे पळ काढला.नांदेड मार्गे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस  पिकपचा पाठलाग करत होते लिंबगाव जवळ सदरील पिकअप हा पलटी झाला. यावेळी सदरील पिकअप मध्ये जनावरे गाईंचा समावेश असून त्या गाईंच्या निर्दयीपणे पाय बांधून त्यामध्ये विक्री किंवा कत्तलीसाठी जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. सदरील वाहन हे पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या या गाडीच्या समोर एम एच 20 असे पासिंग नंबर आहे तर गाडीच्या पाठीमागील एम एच 26 असे दोन क्रमांकाच्या नंबर प्लेट असल्याचेही आढळून आले आहे.

यामुळे सदरील गाडी ही जनावरांच्या वाहतुकीसाठी वापरली जात असून यामध्ये जनावरांची चोरट्या पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यामुळे सदरील गाडी कुणाची आणि यावर दोन दोन नंबर आले कसे हा आता शोधाचा विषय असून याप्रकरणी पोलीस आता कसून शोध घेत आहेत याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!