
वसमत / रामु चव्हाण
वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे
त्यानिमित्ताने वसमत शहर पोलीस स्टेशन आणि वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने वसमत तालुक्यात व शहरांमध्ये रन फाॅर युनिटी मिनी मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे.

वसमत शहर पोलिस स्टेशन च्या वतीने सकाळी 6-00 वा ही मिनी मॅरेथॉन पोलीस स्टेशन वसमत- गवळी मारोती मंदिर- जवाहर काॅलनी – पाटील नगर – साई अपार्टमेंट-आसेगाव काॅर्नर – बस स्थानक- गवळी मारोती मंदिर- पोलीस स्टेशन वसमत येथे संपणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यानी केले आहे.
तर ग्रामीण पोलीस स्टेशन चा वतीने सकाळी 6 वा जिंतुर टि पाकीट ते माळवटा पाटी पर्यंत ही मिनी मॅरेथॉन होणार आहे.

हिंगोली जिल्हा पोलीस दल मा. पोलीस अधिक्षक सा. यांच्या मार्गदर्शना खाली
पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण यांच्या वतीने
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त दिनांक 31/10/2025 रोजी सकाळी 6.00 वाजता
मॅरेथॉन स्पर्धा – 5 km
*स्थळ*:- जिंतूर टी पॉईंट ते मालवटा पाटी.
प्रोत्साहन बक्षिस पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण*
1) प्रथम बक्षिस -1500/- व ट्रॉफी
2) द्वितीय बक्षिस -1000/व ट्रॉफी
3) तृतीय बक्षिस – 700/- व ट्रॉफी
नाव नोंदणी:- फि नाही
*आयोजक*:- पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण..
*संपर्क*:- *1)API गजानन बोराटे* (7774844864)
*2) PSI एकनाथ डक (9730888897). 3) साहेबराव चव्हाण DSB*(9822140441)
एक दौड देश की एकता और अखंडता के लिए
यात खेळाडू व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामीण पोलीस स्टेशन चे सपोनी गजानन बोराटे यानी केले आहे.



