क्राईम स्टोरी

हिरडगाव येथील विहीरीत सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह

मुख्य संपादक रामु चव्हाण

*वसमत तालुक्यातील हिरडगावात विहिरीत आढळले अज्ञात इसमाचे प्रेत; कुरुंदा पोलिसांकडून तपास सुरू*

*वसमत CT NEWS*

वसमत तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील हिरडगाव शिवारातील एका शेतातील विहिरीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह तरंगत्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिरडगाव शिवारात असलेल्या ज्ञानेश्वर बोंगाणे यांच्या शेतातील विहिरीमध्ये आज एक अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती कुरुंदा पोलीस ठाण्याला दिली.
घटनास्थळाचा पंचनामा आणि पुढील कारवाईसाठी कुरुंदा पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
*तपास सुरू:* सदर मृतदेह कोणाचा आहे? हा घातपाताचा प्रकार आहे की आत्महत्या? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कुरुंदा पोलीस या अज्ञात इसमाची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत असून, पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास पोलीस प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे.

मुख्य संपादक: रामू चव्हाण

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!