हिंगोली जिल्ह्यामध्ये मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ कंपनी कायद्याच्या कलम ८ नुसार ना-नफा तत्त्वावर एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
शासन निर्णयान्वये मा. श्री. हेमंत पाटील, माजी लोकसभा सदस्य (हिंगोली लोकसभा मतदार संघ) यांची मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ‘हिंगोली येथे हळदी संशोधन केंद्र उभारणे’ या विषयाबाबत बुधवार दिनांक २४.०७.२०२४ रोजी बैठक संपन्न झाली. उक्त बैठकीत अध्यक्ष, मा. बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, हिंगोली यांना मंत्री पदाचा दर्जा देणेबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले आहेत.
त्या नुसार हेमंत पाटील, अध्यक्ष, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, हिंगोली हे सदर संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्ष पदावर कार्यरत असेपर्यंत त्यांना मंत्री पदाचा दर्जा प्रदान करण्यात येत असल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव यांनी काढले आहेत .