वसमत शहरातील सिराज कॉलोनी येथील रहीवासी मौलाना मंजूर अहमद यांचा मुलगा शेख मजहर याची नुकतीच पार पडलेल्या पोलीस भरतीत मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे महाराष्ट्र राज्यात नुकत्याच झालेल्या पोलीस भरती मध्ये मुंबई पोलीस दलात अडीच हजार जागांची भरती निघाली होती त्यासाठी असंख्य हजारो युवकांनी या भरती प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवला होता त्यामध्ये वसमत येथील सुद्धा काही युवकांनी भरती दिली होती त्यामधून शेख मजहर यांनी आपले कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादित केले आहे.
शेख मजहर यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने आई वडील,काका काकी, मोठे बंधू पत्रकार खदीर अहेमद, शेख मन्सूर, शेख मुजफ्फर, शेख मुदस्सर,चुलत बंधू पत्रकार शेख एजाज,शेख इलयास, शेख सलमान, शेख उझेर, शेख रिझवान,शेख समी,आणि सर्व मित्र परिवार यांच्याकडून वसमत मध्ये जागोजागी सत्कार करून शुभेच्छा दिल्या जातं आहे.