कुरुंदा येथील जलेश्वर नदीच्या खोलीकरण व सरळीकरणाच्या कामास कुरूंदा येथील नागरिकांनी केलेल्या आंदोलनास व सरपंच राजेश पाटील इंगोले यानी केलेल्या पाठपुराव्यामुळे सुरुवात झाली आहे,१० मे रोजी उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खलाळ ,कुरूंद्याचे सरपंच राजेश पाटील इंगोले यांनी नदी कामाची पाहणी केली,व लवकरच दोन जेसीबी नदी कामासाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत असे सांगितले,पुलाचे दोन गाळे व मुख्य रस्ता मार्गावरील दोन्ही बाजुचे नाले सफाई करण्यासाठी पाऊल उचलावे असेही त्यांनी सांगत नदीच्या सरळीकरण व खोलीकरण कामास गती देण्यात येईल असे ते म्हणाले,याप्रसंगी जलेश्वर नदी पात्राची हाद निश्चित करण्यात आली त्यानुसार नदीचे काम होणार आहे,उगम फाटा ते आसेगाव मार्गाचे काम करणारे के.टी. कंत्राटदार यांच्या अभियंत्यास उपविभागीय अधिकारी डॉ खलाळ यांनी गावातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूचा उपसा लवकरात लवकर करा आशी सुचनाही दिल्या आहे,यावेळी सरपंच राजेश इंगोले पाटील,मंडळ अधिकारी अनंद शिंदे यांच्या सह आदिंची उपस्थिती होती.