बहिर्जी स्मारक महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन संस्थेचें सचीव मा आ पंडितराव देशमुख यांच्या हस्ते पार पडले .यावेळी आपल्या उद्घाटकीय मनोगतात पंडितराव देशमुख यांनी आजचा बदलणारा विद्यार्थी बदलत जाणारी शिक्षण पद्धती यांचा वेध घेत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या . पोलीस उपनिरीक्षक पुणे तथा महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी सुप्रिया पंढरकर यांनी विद्यार्थ्याची मुक्तपणे संवाद साधला त्यावेळी बोलत होत्या आज विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची मानसिकता प्रचंड बदललेली असून एकाच वेळी हातातला मोबाईल फोन घरची परिस्थिती सभोवतालचे वातावरण समाजाची आणि पालकांची अपेक्षा .या ताणतणावात विद्यार्थी भरकट जाताना दिसतो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समोर अनेक समस्या उभे आहेत . विद्यार्थिनींची इच्छा असूनही गुणवत्ता असूनही त्यांना उच्च शिक्षणात प्रवेश करता येत नाही . या सर्वांमुळे विद्यार्थी आज नैराश्यग्रस्त होताना दिसतो समाजात वाढणारी गुन्हेगारी आणि यातील तरुणांचा सहभाग चिंतनीय असा आहे आज या तरुणांना स्वप्नभेडसावतात परंतु ती पूर्ण करण्यासाठी अनुकूल परिस्थिती पार्श्वभूमी नसते ही परिस्थिती हेरत बहिर्जी स्मारक महाविद्यालयाने स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा विचार हा स्वागत आहे .परिसरातील हे मोठं आणि प्रतिष्ठेचा महाविद्यालय असून या महाविद्यालयामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण होतं परिसरातील हजारो विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेतात आज काळाची पावले ओळखत महाविद्यालयाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संदर्भातल्या मार्गदर्शनाचे केंद्र सुरू करून नव्या पिढीसाठी एक विश्वासाचं आणि आशेचं कार निर्माण केला आहे या परिसरातील अनेकांना याचा निश्चितच फायदा होईल .
माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत या महाविद्यालयाचा फार मोठा वाटा आहे माझ्यासारखी सर्वसामान्य घरातली मुलगी अधिकारी पदापर्यंत पोहोचू शकते तर माझ्यासमोर बसलेल्या शेकडो मुलींचे आयुष्य माझ्यापेक्षा निश्चितच चांगलं हे महाविद्यालय घडवू शकतं याचा विश्वास मला आहे अशा शब्दात सुप्रिया पंढरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष मा आ अँड मुंजाजीराव जाधव होते त्यांनी आपल्या अध्यक्ष समारोपात महाविद्यालयाने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत भावी आयुष्यात यशस्वी वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि महाविद्यालय वेळोवेळी अशा उपक्रमांसाठी सज्ज राहील अशी ग्वाही दिली प्रमुख अतिथी अँड .रामचंद्रजी बागल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी जी गवळी, उपप्राचार्य . एन लोखंडे डॉ पी डब्ल्यू पाटील .डॉ शारदा कदम ., डॉ अशोक कुलकर्णी . समन्वयक डॉ रामचंद्र कुमावत इत्यादींची उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शारदा कदम यांनी केले .प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ पांडुरंग बर्वे यांनी करून दिला .सूत्रसंचालन डॉ .कुमावत यांनी तर आभार प्रा .पवार यांनी मानले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि प्राध्यापकांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ व्ही नरवाडे , डॉ नागनाथ गजमल, क्रीडा संचालक अकमार , डॉ नरसिंग पिंपरणे ,अनिल पंडित व विद्यार्थी परिश्रम घेतले.