कुरुंदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील गोपीनवार यांनी मोठी कारवाई करत गावठी बंदूक विकणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या असून सदरील इसम गावठी बंदूक काडतुसासह पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा देशी कट्टा व सोबत काडतूस असे एका मोटर सायकल वर घेवून वाई फाटा येथे येत आहे अशी माहिती मिळाल्यावरून सर्व टीमसह सदर ठिकाणी सापळा रचून संशयीत मोटरसायकल वरून येणा-या ईसमास शिताफीने थांबून त्याच्याजवळ पंचा समक्ष चौकशी केली असता इसम नामे रमाशंकर ओमप्रकाश कशब रा उत्तर प्रदेश वयं २८ त्याच्या जवळ एक गावठी कट्टा किंमती 20,000/रू व जीवंत काडतूस किं5000/रु,मोबाईल किं 10,000/रू व मोटरसायकल क्र UP 27 K 3234 किं 40,000/ रू असा एकूण 75000 रू मुद्देमाल मिळून आला आहे.
सदरील कारवाई .राकेश कलासागर पोलीस अधीक्षक हिंगोली, यशवंत काळे अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.कांबळे साहेब यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली आम्ही सपोनि गोपीनवार,ASI वाळके,पोलीस कर्मचारी ,आमले, पटवे, ढेंबरे, सोळंके,गजानन भोपे यांच्या पथकाने केली आहे.
सदरील इसमास पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.