येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंचधातु पासुन बनविलेल्या पुर्णाकृती अश्वारूढ पुतळा ९ ऑक्टोबर रोजी जयपुर हुन वसमत कडे निघाला आहे तो पुतळा मंगळवारी मध्यरात्री वसमत येथे पोहोचणार असून वसमत वासियांची बऱ्याच दिवसांपासून महाराजाचा पुतळा कधी बसणार ही प्रतिक्षा आता संपली आहे दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी बुधवारी सकाळी दहा वाजता नांदेड रोड वरील रिलायन्स पेट्रोल पंप येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची ऐतिहासिक मिरवणूक ढोल ताशाच्या गजरामध्ये निघणार असल्याची माहिती आमदार राजू भैया नवघरे यांनी आज झालेल्या बैठकीमध्ये दिलेली आहे .
या मिरवणुकीमध्ये वसमत तालुक्यातील तमाम शिवभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे तसेच या मिरवणुकी साठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती सह शिवभक्त काम करत असून ढोल-ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक रिलायन्स पेट्रोल पंप ते नियोजित छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवउद्यान वसमत येथे आणण्यात येणार असल्याची माहिती पुतळा समितीचे सचिव सुनील भाऊ काळे यांनी दिली आहे या कार्यक्रमासाठी आमदार राजू भैया नवघरे नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, पुतळा समितीचे सचिव सुनील भाऊ काळे, तानाजी बेंडे, नगरसेवक शिवाजी अलडिंगे, धनंजय गोरे ,नवीन कुमार चोकडा, त्रंबक राव कदम, गजानन ढोरे, बालुमामा ढोरे,राजेश पवार,प्रा नामदेव दळवी,मनोज भालेराव,राजेश क्षीरसागर सह हु.बहिर्जी मित्र मंडळ,शिवप्रेमी उपस्थित होते.