22 जानेवारी रोजी आयोध्यातील राम मंदिरामध्ये राम लल्ला चे प्राणप्रतिष्ठापना होत आहे हा आनंद उत्सव संपूर्ण हिंदुस्थानातच नव्हे तर जगाभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्ताने वसमत तालुक्यातही विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे विश्व हिंदू परिषदेतर्फे शहरातील 51 मंदिरांमध्ये महायज्ञ, हनुमान चालीसा पठाण ,रामरक्षा पठण, महाआरती, महाप्रसादाचे वाटप अनेक ठिकाणी करण्यात येत आहे .
तसेच शहरातील झेंडा चौक वसमत येथे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आयोध्यातील रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेचे लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अयोध्येमध्ये कार सेवा करणाऱ्या कारसेवकांचाही सन्मान विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात येणार आहे.तसेच अयोध्येमध्ये होणारे प्राणप्रतिष्ठा स्थापनेनिमित्त महाआरतीचा कार्यक्रमही यावेळी होऊन आरती झाल्यानंतर लागली प्रसादाचे वाटप ही यावच ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच आयोध्यातील रामलीलाच्या प्राणप्रतिष्ठावस्थापने निमित्त फटाक्यांची आतिषबाजी ही यावेळी वसमतकरांना पहावयास मिळणार आहे तरी जास्तीत जास्त भक्तांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग दल, दुर्गा वाहिनी यांच्या वतीने करण्यात आले आहे.