लाल बहादूर शास्त्री विद्यालयात आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी…
वसमत/ रामु चव्हाण
अमृतज्ञान सेवाभावी संस्था संचलित लाल बहादूर शास्त्री विद्यालय वसमत येथे १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकसाहित्यकार अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी इंग्रजी माध्यमाचे प्रिंसिपल श्री आसाराम दुधाटे व सेमी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा गोंगे व श्री संदीप चाटोरीकर यांनी लोकमान्य टिळक आणि लोकसाहित्यकार अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले .यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्याच बरोबर शाळेचे सहशिक्षक श्री संतोष राऊत यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे यांच्या बदल माहिती सांगताना सांगितले की, “जर आपल्यात जिद्द असेल तर आपण कोणतेही काम सहजतेने करू शकतो.” या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन लिंगायत यांनी तर आभार श्री मोतीराम कोरडे यांनी मानले. प्रि-प्रायमरीच्या चिमुकल्यांनीही मोठ्या
उत्साहाने सहभाग घेतला होता व आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप चव्हाण यांनी कौतुक केले.