वसमत उपजिल्हा रुग्णालय नेहमीच वादाच्या चर्चेमध्ये राहिलेला आहे. या रुग्णालयात नेहमीच औषधांचा तुटवडा,डॉक्टरांची नेहमीच उशिरा येण्याची परंपरा, बंद असलेले ऑपरेशन थेटर ,एक्स-रे मशीन, रुग्णांना रेफर करणे यासह नेहमीच वसमत उपजिल्हा रुग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत राहत होत.
पण आता या सर्व चर्चेला वादाला पूर्णविराम मिळणार असून वसमत उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अध्यक्षपदी डॉक्टर गंगाधर काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रुग्णालयाचे कायापालट करण्याचा चंग त्यांनी बांधला असून वसमत उपजिल्हा रुग्णालय सध्या कात टाकत असून रुग्णालयात स्वच्छता साफसफाई यासह वसमत उपजिल्हा रुग्णालयात सामान्य वर्गामध्ये असलेले शौचालय नवीन स्वरूपात झाले असून प्रत्येक वर्गात स्वच्छ शौचालय त्याचप्रमाणे ऑपरेशन थेटर ,एक्स-रे मशीन नवीन आणण्यात आलेली असून आता वसमत उपजिल्हा रुग्णालय मध्ये पिण््यसाठी शुद्ध पाणी मिळणार आहे.
वसमत उपजिल्हा रुग्णालयात रंगरंगोटी,विद्युत उपकरणे बदलण्यात आली आहे,रुग्णालयातील खिडक्यांना डासांपासून संरक्षणासाठी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत,गेली अनेक वर्षांपासून बंद असलेले दोन्ही ऑपरेशन थेटर सुरू करण्यात आली आहेत.नवीन एक्सरे मशिन सुरू करण्यात आली आहे.
यामुळेच तालुक्यातील रुग्णांना उच्च दर्जाचे सुविधा उपचार आता वसमत येथेच मिळणार आहे.
तसेच आता महिन्याच्या पहिल्या व तिस-या बुधवारी अपंगत्वाचे प्रमाणपत्र वसमत येथेच मिळणार आहे.
तसेच दहा ICU बेडसह माॅड्युलर ऑपरेशन थेटर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुसज्ज झाल आहे.
यामुळेच एक वैद्यकीय अधीक्षक काय काय करू शकतो हे डॉक्टर गंगाधर काळे यांनी या रुग्णालयाचे कायापालट करून दाखवल आहे.जे की या अगोदरच्या कुठल्याही वैद्यकीय अधीक्षक यांना जमले नाही.या सर्व सुविधेसह रूग्णालय पुढील महिन्यात कार्यान्वित होणार आहे.