आरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्र

मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील यांची निवड

रामु चव्हाण

वसमत  / रामु चव्हाण

शब्द सहावे मराठी विश्व साहित्य संमेलन , मालदीव २०२२ च्या ‘ संमेलनाध्यक्ष ‘ पदावर प्राचार्य श्री नागनाथ पाटील यांची निवड

नांदेड मराठवाडा भागास प्रथमच हा बहुमान प्राप्त

शब्द परिवाराची विश्व विक्रमाकडे आगेकुच

——————————————————–

शब्द परिवार हि महाराष्ट्रातील एक कायम हटके दर्जेदार उपक्रम घेणारी संस्था.अल्पावधितच या संस्थेने जगभर आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे.
थाईलैंड , दुबई , इंडोनेशिया , मलेशिया , श्रीलंका येथे मराठी विश्व साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडल्यानंतर येत्या जानेवारी २०२२ मधे मालदीव येथे सहावे शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.
या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे ‘ संमेलनाध्यक्ष ‘ म्हणून श्री नागनाथ पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे.
शब्द परिवाराचे अध्यक्ष श्री संजय सिंगलवार यांनी नुकतीच हि घोषणा केली.

श्री नागनाथ पाटिल हे वसमत जि.नांदेड येथील
श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालय येथे प्राचार्य असून त्यांनी लंबाड़ी , कोंडणातलं जीणं , हुतराणी
या कादंबरीचे लेखन केलेले आहे.
रानभुल , मँपको हे कथासंग्रह तर खोल दोहातील सावल्या , सावली हरवलेलं झाड हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत.तसेच अर्वाचीन मराठी कवितेचे संपादन सुद्धा त्यांनी केलेले आहे.
मराठवाड्यातील मराठी कविता एक विवेचक अभ्यास यावर डॉ नागनाथ पाटील यांचे संशोधन आहे.
संशोधक मार्गदर्शक म्हणून त्यांच्या मार्फ़त १३ विद्यार्थ्यांनी आपले संशोधन पूर्ण करून पीएचडी प्राप्त केलेली आहे.
१) लंबाड़ी – अखिल भारतीय मराठी वाङमय परिषद बडोदा गुजरात सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार
२) कैलास पब्लिकेशनचा चिकलठाणकर पुरस्कार
३) वारणेचा वाघ पुरस्कार , कोल्हापुर
४) नरहर कुरुंदक़र उत्कृष्ट कथासंग्रह मँपकोसाठी मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद पुरस्कार
५)अखिल भारतीय आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन साक्री जि.धुळे येथील ‘ अबील खिचडा ‘ कथेस सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार
६) अखिल भारतीय आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन वाळवा जि.सांगली येथे ‘ माय ‘ कथेस सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार
७) मँपको कथा संग्रहास कयाधू पुरस्कार हदगाव
८) हुतराणी कादंबरीस पद्मगंधा फाउंडेशन अहमदनगरचा पद्मगंधा पुरस्कार

डॉ.नागनाथ पाटील यांचे बरेचसे साहित्य अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आलेले आहे.
१) कोंडणातलं जीणं – कादंबरी बी.ए.द्वितीय वर्ष स्वा.रा.ती.म.विद्यापीठ , नांदेड़
२) रानभुल – कथा बी.ए.प्रथम वर्ष स्वा.रा.ती.म.विद्यापीठ , नांदेड
३) माय – कथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद

तसेच डॉ नागनाथ पाटील यांनी
अध्यक्ष ,मराठी अभ्यास मंडळ , स्वा.रा.ती.म.विद्यापीठ नांदेड,अधिसभा सदस्य,
विद्यापरिषद सदस्य सारखी अनेक पदे भूषवलेली आहेत.
विविध साहित्य संमेलनात तसेच विविध महाविद्यालयात कथाकथन त्यांनी केलेले आहे.

शब्द च्या पहिल्या विश्व मराठी सम्मेलनाचे बैंकॉक मधे प्रथम अध्यक्ष प्रसिद्ध कवी गीतकार अभिनेते किशोर कदम -सौमित्र होते.दुसऱ्या दुबई येथील मराठी विश्व साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी सखेसाजणीकार प्रा.ज्ञानेश वाकुडकर , नागपुर होते .तिसरे शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन इंडोनेशिया मधे संपन्न झाले होते त्याचे अध्यक्ष प्रसिद्ध जेष्ठ गजलकार श्री ए.के.शेख , पनवेल हे होते.चौथे शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन मलेशिया मधे झालेले.त्याचे अध्यक्ष साम टिव्हीचे माजी संपादक , दै.दिव्य मराठीचे राज्य संपादक श्री संजय आवटे, पुणे तर श्रीलंका येथे झालेल्या शब्दच्या पाचव्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ गजलकार प्रा.सिद्धार्थ भगत , यवतमाळ यांनी भूषवले होते.
त्यानंतर प्रथमच हिंगोली मराठवाडा भागास हा बहुमान डॉ.नागनाथ पाटील यांच्यामुळे प्राप्त होतो आहे याचा परिसरातील सर्व नागरिकांनी व सहित्यिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!