वसमत नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीनंतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग का चा पहिला हप्ता तसेच आक्टोंबर चे वेतन दिवाळीसाठी अग्रिम बोनस आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम असे एकूण 1 कोटी 10 लाख 67 हजार रुपयांची दिवाळी भेट कर्मचाऱ्यांना देण्यात आली असून नगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनांनी नगराध्यक्ष यांचे आभार मानले आहेत.
नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी दाखवलेल्या तत्परते बदल कर्मचाऱ्यानी समाधान व्यक्त केले आहे.
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे या मागणीला नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार यांनी पुढाकार घेऊन कर्मचाऱ्यांच्या दिवाळीनिमित्त ऑक्टोबर महिन्याचे वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम यांचा पहिला हप्ता महागाई भत्ता फरकाची रक्कम व दिवाळी सणाच्या अग्रिम असे एकूण एक कोटी दहा लाख 67 हजार रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळी अगोदरच वर्ग केली आहे.
याबाबत नुकतेच धनादेश नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार यांनी संघटनेचे अध्यक्ष सुभाष कदम यांना दिला आहे यावेळी मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, मुमताज खान, शेख मुजावर व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.