महाराष्ट्रराजकीय
शिवसेना भवन येथे कन्हैया बाहेती यांच्या तिसऱ्या कार्डियाक रूग्ण वाहिकेचा लोकार्पण
वसमत/ रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
शिवसेना भवन, मुंबई येथे “युवासेना जिल्हाप्रमुख श्री कन्हैय्या भैय्या बाहेती” यांच्या तिसऱ्या (cardiac ambulance)रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला !!!
आज रोजी युवासेना जिल्हाप्रमुख श्री कन्हैय्या भैय्या बाहेती यांनी वसमत तालुक्यातील रुग्णांच्या सेवेत सलग तिसरी (cardiac ambulance) रुग्णवाहिका दिली असून रुग्णवाहिकेचे लोकार्पण दादर येथील शिवसेना भवन येथे शिवसेना सचिव श्री सुरज चव्हाण साहेब व युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश दादा कदम* यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यापूर्वी युवासेना जिल्हाप्रमुख श्री कन्हैय्या भैय्या बाहेती यांच्या वतीने वसमत तालुक्यातील रुग्णांच्या सेवेत एका पाठोपाठ एक अशा दोन रुग्णवाहिका दिलेल्या आहेत ,
रुग्णांच्या सेवेत आपण कुठेही कमी पडू नये, रुग्णांना वेळेच्या आत उपचार मिळाले पाहिजे ,केवळ रुग्णवाहिका वेळेवर न आल्यास कित्येक रुग्ण दगावतात याच अनुषंगाने युवासेना जिल्हाप्रमुख श्री कन्हैय्या भैय्या बाहेती यांनी रुग्णांची गैरसोय टाळता यावी त्यांना वेळेच्या आत उपचार मिळावा यासाठी ही तिसरी (cardiac ambulance) रुग्णवाहिका आज वसमत तालुक्यातील जनतेसाठी लोकार्पण केली आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख श्री कन्हैय्या भैय्या बाहेती यांच्या संघटना बळकटीकरनाचे व समाजकार्याचे भरभरून कौतुक* यावेळी शिवसेना व युवासेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या वतीने करण्यात आले
यावेळी युवासेना हिंगोली जिल्हा विस्तारक अभिषेक ,युवासेना विस्तरक् दिलीप घुगे, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम , उपजिल्हाप्रमुख ईश्वरभैय्या तांबोळी ,युवासेना सहसचिव अजय भैय्या मुंदडा,माजी उप जिल्हाप्रमुख गजानन मुळे, उद्धव सावंत, तालुकाप्रमुख संदीप कातोरे ,शंकर कदम,शहरप्रमुख धीरज,सोनू वाघमारे,माऊली काळे, कुल्थे,संभाजी डाखोरे,माणिक वारे,सागर चेपुरवार्,दिनेश अलगुंडे,कृष्णा भोसले, सह सर्व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.