राजकीय

कुरूंदा येथील स्मशानभूमीस खा.हेमंत पाटील यांच्या प्रयत्नातून 5 लाखाचा निधी मंजूर

वसमत/ रामु चव्हाण

खा.हेमंतभाऊ पाटील यांच्या प्रयत्नाने स्मशान भूमीस 5 लक्ष रुपयांचा निधी मंजूर..

सरपंच राजेश इंगोले पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

वसमत / रामु चव्हाण

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या प्रयत्नाने व सरपंच राजेश पाटील इंगोले यांच्या पाठपुराव्याने जनसुविधा योजने अंतर्गत स्मशान भूमीत जाण्याकरिता पुल कामासाठी ५ लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला आह. पुल कामाचे १४ नोव्हेंबर रविवार रोजी भुमिपुजन सरपंच राजेश इंगोले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच वामन दळवी, चेअरमन बाबुराव शेवाळकर, यादवराव इंगोले, दत्तरामजी इंगोले, गणेश नरडेले, मन्मथ सिध्देवार, शेख कलीम, शे मुखीद, लतीफ कुरेशी, निलेश इंगोले, बळीराम कदम, मारोती आवरदे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिंची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!