वसमत शहर येथे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनची व परिसराची साफ सफाई, झाडांची कटिंग. तसेच झाडावर बसणाऱ्या पक्षांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
आज दि 11 मार्च रोजी सकाळी सहा वाजता वसमत शहर पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी यांना पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी स्वच्छतेचे व आरोग्याचे महत्त्व समजावून सांगत. सर्वांच्या आरोग्य चांगले राहावे या करीता व्यायामाचे महत्त्व समजून सांगितले तसेच सर्वप्रथम पिटी व योगा, व्यायामाचे वेगवेगळे प्रकार करूनच घेतले. व आपण स्वतः केले.
त्यानंतर पोलीस स्टेशनच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे महत्त्व समजून सर्व पोलीस स्टेशन परिसर कधी नव्हे एवढा स्वच्छ करण्यात आला. परिसरातील झाडांची कटिंग करण्यात आली. तसेच झाडावरील पक्षांकरिता पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुधीर वाघ. बालाजी महाजन. साहेबराव कसबे वाड यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.