
वसमत / रामू चव्हाण
हिंगोली जिल्ह्यांमध्ये झालेल्या बंडखोरी नंतर आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर लागलीच खासदार हेमंत पाटील यांनी सुद्धा शिंदे गटांमध्ये प्रवेश केल्यानंतर हिंगोली जिल्ह्यांमध्ये शिवसेना फुटणार अशी चर्चा सुरू होती.तसेच शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कोणाला मिळेल अशी चर्चा गेली तीन महिन्यापासून सुरू असताना आज शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख जाहीर करण्यात आले असून यामध्ये विनायक भिसे यांना हिंगोली आणि कळमनुरी तर संदेश देशमुख वसमत आणि सेनगाव हे दोन तालुके याप्रमाणे दोन जिल्हाप्रमुख जाहीर झाले असून आगामी काळामध्ये शिवसेना आणि शिंदे गट यामध्ये जोरदार सता संघर्ष पहावयास मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच यावेळी हिंगोली जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्याचे सुद्धा विविध पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहे.