वसमत शहरात दि.01 जुलै रोज शुक्रवारी भर दिवसा एका शेतकऱ्याच्या मोटरसायकलच्या डिक्कीतून साडेचार लाख रुपये पळविल्याची घटना भरदिवसा
शहरात घडली असून यामुळे एकच खळबळ झालेली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मौजे विरेगाव येथील विठ्ठल विश्वनाथ बोंढारे हे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वसमत येथील सराफा व्यापारी यांच्याकडे दागिने ठेवून शेतीच्या कामासाठी त्यांच्याकडून अडीच लाख रुपये घेतले तसेच स्वतः विठ्ठल बोंढारे यांच्या जवळ शिल्लक असलेले दोन लाख असे एकूण साडेचार लाख रुपये मोटरसायकलच्या डिक्की मध्ये समोरील बाजूला ठेवलेले होते यावेळी सराफा बाजार येथून मोंढ्याकडे जात असताना मोंढातील बहिर्जी शाळा जवळील चौकात असलेल्या मारुती मंदिराजवळ दोन अज्ञात इसम पाठीमागून आले आणि विठ्ठल बोंढारे यांना तुमचे पैसे खाली पडले आहेत असे सांगून मोटरसायकलच्या बाजूलाच थांबले असता बोंढारे हे पैसे पडल्याचे पाठीमागे पाहत असताना तेवढ्या मध्ये नजर चुकवून सदरील दोन इसमांनी गाडीच्या डिक्कीत असलेले साडेचार लाख रुपये घेऊन फरार झाले. असून याप्रकरणी विठ्ठल बोंढारे यांच्या फिर्यादीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महिपाळे हे करत आहेत.