खांडेगाव पाटील जवळ असलेल्या एस आर पेट्रोल पंपाजवळ सकाळी झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहे.
वसमत तालुक्यातील खांडेगाव पाटी च्या समोरील एस्सार पेट्रोल पंप येथे बोलेरो पिकप क्रमांक MH-26 BE- 6586 या गाडीच्या चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने गाडी चालवत रस्त्याने जात असलेल्या मोटरसायकल क्रमांक RJ -06 SA- 4934 व बसून डिझेल आणण्यासाठी जाणारे शंकर भैरू गुजर व देवकरण रामजी गुजर रा.डोटा तहसील आंसिद जि.भिलवाडा ह.मु भोगाव ता.वसमत हे दोघे भोगाव येथून खांडेगाव पाटी जवळ असलेल्या पंपावर डिझेल नेण्यासाठी येत असताना पिकप चालकाने भरधाव वेगाने यांना पाठीमागून जोरदार धडक दिली यात देवकरण रामजी गुजर वय अंदाजे बत्तीस वर्ष त्यांचा जागीच मृत्यू झाला तर शंकर गुजर हे गंभीररीत्या जखमी झाला असून त्यास 108 रूग्णवाहिकेने वसमत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यावर तेथे उपचार सुरू असून या बोलेरो पिक मधे पाच बैल मोठ्या क्रूरतेने व निर्दयपणे कोंबून सदरील वाहन चालवून मयतास कारणीभूत ठरलेल्या वाहनावर फिर्यादी सावर उर्फ सावर लाल भैरूलाल गुजर यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे. तर या पिकप मध्ये निर्दय पणे व क्रूरतेने बैल भरून हेेे बैल नेमके कुठे नेले जात होते व कोणाचे होते याचा तपास पोलिस प्रशासनाने घ्याावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे . याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे हे करत आहेत.