वसमत पासून जवळच असलेल्या कवठा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर फौजदार ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पथकाने धाड टाकून 2 लाख 36 हजार चा मुद्देमाल जप्त केला आहे.
वसमत तालुक्यातील कवठा शिवारामध्ये कॅनल जवळ झुडपांमध्ये काहीजन जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पथकाने कवठा शिवारात झना मन्ना जुगार खेळत असलेल्या अड्ड्यावर धाड टाकत एकूण 2 लाख 36 हजार 440 रू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यात 10 हजार 440 रू नगदी ,4 मोबाईल तसेच 4 मोटर सायकल असा दोन लाख 36 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच या कारवाईमध्ये बबन म्हात्रे रा.कूरूंदा,प्रकाश बळवंते ( दांडेगाव )शफी शेख ,राजेश मुळे ,-राजु कपाटे,विश्वनाथ हमाने, रा.कुरूंदा व चार MH -26 W-3014,MH 38 U9727, MH 26BR 4266 ,MH 38 Q 0351 मोटरसायकल चे मालक ग असे एकूण दहा जणांविरूद्ध वसमत ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये दहा हजार 440 रुपये नगदी 4 मोबाइल तसेच 4 मोटर सायकल असा एकूण दोन लाख 36 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरील धाड ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पथकाने टाकली असून सदरील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे