१८ व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती आज विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य १८व्या शतकात समाजाचा मोठा विरोध पत्कारत स्त्री-शिक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी ओळखले जाते. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले .
अशा थोर समाजसेविका क्रांतिवीर सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आपण साजरी करतो त्यामुळे मुलींनी शिक्षणामध्ये व विविध क्षेत्रामध्ये पुढे यावे व आपणही समाजापुढे एक आदर्श निर्माण करावा असे मत शिक्षिका संगीता नेमाडे यांनी यावेळी बोलून दाखवले तर या वेळी शाळेमध्ये महिला मेळावा सुद्धा घेण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी क्रांतिवीर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांची वेशभूषा साकारली होती. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उघडे दिलीप अंकुश व शिक्षिका संगिता नेमाडे ,शाळेतील विद्यार्थी ,पालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते