आरोग्य व शिक्षण

काव्यांगण साहित्य मंच तथा भारतमाता सन्मान मंच तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त कविसंमेलन

रामु चव्हाण

प्रजासत्ताक दिना निमित्त काव्यांगण साहित्य मंच तथा भारत माता सन्मान मंच च्या सयुक्त विद्यमाने काव्यसंमेलन संपन्न …

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय संस्था आणि भारतमाता सन्मान मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आँनलाईन(गुगलमीटच्या माध्यमातून) हिंदी भाषिक भव्यदिव्य काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.
या संमेलनाचे अध्यक्ष काव्यांगण साहित्य मंचचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मान.राजू पाडेकर,अहमदनगर, संस्थापक राष्ट्रीय उपाध्यक्ष मान. सौ प्रांजली प्रविण काळबेंडे, वसई,संस्थापक राष्ट्रीय कार्याध्यक्ष मान. नीरज आत्राम,चंद्रपूर तसेच भारतमाता सन्मान मंचचे संस्थापक अध्यक्ष मान.ऍड.पुरूषोत्तम मित्तल ,राष्ट्रीय प्रभारी मान. ऋतू गर्ग, सिलिगुडी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच आपापल्या संस्थेच्या हेतू आणि उद्दिष्टाबद्दल मनमोकळा सुसंवाद साधला.
*भारत माता सम्मान मंच & काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय संस्था*द्वारा सर्व कवींना सन्मानित करण्यात आले.
*🇮🇳 काव्य सम्मेलन के कवीगण नामांकन लिस्ट🇮🇳*
गायत्री पांडे – उत्तराखंड शगुफ्ता रहमान ‘सोना’ – उत्तराखंड
प्रवीण शर्मा ताल – रतलाम रमा बहेड – हैदराबाद
ऋषि तिवारी – सिवान बिहार,अलका गुप्ता प्रियदर्शिनी – लखनऊ उत्तर प्रदेश,एल. सी. जैदिया “जैदी” बिकानेर राजस्थान,ऋषि रंजन – दरभंगा बिहार,वंदना यादव चित्रकूट उत्तर प्रदेश,अर्चना शर्मा। दिल्ली, डाॅ.दिनेश व्यास “ललकार राजस्थान चित्तौड़ भीमगढ़ (भारत ),ऋषि रोही दरभंगा बिहार,शोभाराणी तिवारी,रेणू अब्बी रेणू चंडीगड,सुनीता गर्ग पंचकुला,दीपक (पलवल),भावना विधानी,नीरजा शर्मा,संगीता शर्मा कुंद्रा चंडीगड,मधु गोयल कैथल हरियाणा
,गरिमा पंचकूला,राजेश तिवारी मक्खन झांसी, माधुरी शर्मा मधुर हरियाणा, प्रकाश पिंपळकर चंद्रपूर आदी
निमंत्रितांच्या सर्व कविंच्या रचना सामाजिक संदेश देणा-या तसेच संविधानाचे महत्त्व पटवून देणा-या होत्या.
मान.रेणू अब्बी,मान. शोभा राणी,मान नीरजा मँम ,मान प्रविण शर्माजी ह्यांच्यासारख्या अनुभवी आणि नामवंत साहित्यिकांच्या कविता ऐकावयास मिळाल्या.
मान गायत्री पांडे ह्यांच्या कवितेने सुरुवात झाली.२६ जनवरी अमर रहे..असा नारा देणारी सुंदर रचना होती.
कवी ऋषी तिवारी ह्या कवीने युवा प्रतिनिधित्व करत समाजातील सर्व वयस्कर वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन मागितले. समाजाला दिशादर्शनासाठी युवावर्गाला मार्गदर्शक व्हा असा मोलाचा संदेश दिला.
काव्यसंमेलनाचे मुख्य आकर्षण बारावर्षिय हर्षिता शुक्ला आणि वडिल रवि शुक्ला हे बापलेक ठरले.रविजींच्या स्वरचित रचना दोघांनीही गोड स्वरात सादर केल्या.
कवयित्री माधुरी शर्मा ह्यांनी गेयप्रकारात कविता सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
डॉ दिनेश ललकार ह्यांच्या स्फूर्तीदायी रचनेने संमेलनाची सांगता झाली.
शेवटी ,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक राजू सर,प्रांजली काळबेंडे,नीरज आत्राम सर यांचे हातभार लागले. तसेच यांनी सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काव्यसादरीकरण केले.
एकमेकांच्या रचनांवर भरभरून प्रतिसाद, अभिप्राय देत प्रोत्साहित करीत आनंदोत्सवात हा सोहळा संपन्न झाला.
काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन कवयित्री प्रांजली काळबेंडे ह्यांनी करत सर्वांशी हसतखेळत संवाद साधला.कवी कवयित्री च्या साहित्यिक वाटचालीबद्दल.जाणून घेतले.काव्यांगण लेखणीचे हि संघटना तुम्हास कशी मदतनीस ठरू शकते याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आभार रेणू मॅडम यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!