ताज्या घडामोडी
पाचवा दिवस- श्रीमद्-महावाक्य निरूपण तथा बेलापूर चरित्र निरूपण सोहळा, कुरुंदा
रामु चव्हाण

श्रीमद्-महावाक्य निरूपण तथा बेलापूर चरित्र निरूपण सोहळा, कुरुंदा, ता वसमत, जि हिंगोली.
दिवस पाचवा
व्याख्याते सैंगराजदादा बिडकर (सातारा)
पंचकृष्ण यांना नमन करून प्रवचनाला सुरवात करण्यात आली.आज मनुष्याचे श्रेष्ठपन कशात आहे याचे निरूपण केले.तसेच भगवंतांना जर भेटायचे असेल तर त्यांनी सांगितलेल्या मामेकम् शरणम् व्रज या तत्वज्ञानाला अनुसरून त्या मार्गावर मनुष्याने आपले विचार,वाणी गतिमान ठेवावी तसेच संत सज्जन यांची भेट घ्यावी त्यांच्या सहवासात आपण भगवंताचे चरित्र ऐकावे त्याने भगवंतांची भेट होईल असे सांगितले.मनुष्याचे भलेपण कश्यात आहे हे मनुष्याने बघावे कारण जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा, कारण जग स्वत:ला सांभाळून घेईल; पण जो स्वत:चा घात करुन घेतो त्याला कोण सांभाळणार? तो फार वाईट समजावा. केवळ प्रापंचिक हा असा आत्मघातकी असतो. खोटे कळूनही त्यात सुख मानून तो राहतो, म्हणूनच
जिथे सत्संगाचे सोहळे असतील तिथे ज्ञान श्रवण करण्यासाठी उपस्थित राहावे.कारण अश्या ठिकाणी परमेश्वर स्वतः आलेले असतात.यासाठी प्रपंचातुन मनुष्याने परमार्थ करण्यासाठी वेळ द्यावा. तसेच आपला अहंकाररुपी मी पणा मनुष्याने काढून नम्रतारुपी अलंकार धारण करावा असे आजच्या सत्रात निरूपण केले. व
श्री कृष्ण भगवंताच्या नामाचा जयघोषात आजचे पाचवे सत्र संपन्न झाले.
कार्यक्रम संयोजक – सद्भावना फाउंडेशन (बोरी)