वसमत, / रामु चव्हाण
छत्रपती शिवरायांबद्दल इंस्टाग्राम वर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी वसमत 22 जून रोजी बंदची हाक देण्यात आली आहे.
याबाबत आज उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वसमत यांना या बंद बाबतचे निवेदन सर्व शिवप्रेमींनी वसमत येथे दिले आहे .
या निवेदनानुसार ISIAM KING BOSS 2022 या instagram सोशल आयडी वरून छत्रपती शिवरायांचा अवमान करून अश्लील पोस्ट प्रसारित केल्या आहेत. तसेच वारंवार काही समाजकंटक महापुरुष आणि विविध देवी-देवतांच्या आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत . अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विटंबना केल्याने सर्व महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्याचबरोबर नांदेड येथे गोरक्षक यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला या भ्याड हल्ल्यामध्ये सदरील गोरक्षक हा शहीद झाला असून या दोन्ही घटना ह्या चिड आणणा-या आहेत. यामुळे संबंधित सोशल मीडियावर छत्रपती शिवरायांचे विटंबना करणाऱ्या व गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने कारवाई करण्या ऐवजी सदरील समाजकंटक आजही मोकाट फिरत आहेत. सदरील समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 22 जून रोजी सर्व शिवप्रेमींच्या वतीने वसमत बंद ठेवण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे.या घटनेचा जाहीर निषेध करत आज उपविभागीय अधिकारी वसमत यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर गुरु श्रीपादेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज, कपिल नवघरे विशाल ढोरे , दिलीप भोसले, साईनाथ पतंगे, नितीन गोरे , किशन खराटे, प्रमोद खराटे, गिरीश देशमुख ,प्रभाकर खराटे, विजयकुमार एंगडे, मारुती बुट्टे ,गजानन खराटे ,चंदू सूर्यवंशी ,अक्षय स्वामी ,अमोघ महाराज,कतुरे,रंगनाथ देशमुखे ,गोविंद चव्हाण,जवळेकर आदी शिवप्रेमीच्या सह्या आहेत.